This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदासाठी जागा | 70 हजार मिळेल पगार
राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. टेक्निकल लीड, प्रोग्रामर, टेस्टर पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडे ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत टेक्निकल लीड, प्रोग्रामर, टेस्टर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

टेक्निकल लीड या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे बीई/बीटेक/ एमसीएची पदवी असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवारांना वेब डेव्हलपमेंट टेक्नोलॉजी, जावा, एचटीएमएल, सीएसएस, आरडीबीएमएस यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा सहा वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असावा. तसेच आर्किटेक्चरचे शिक्षण असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७० हजार रुपये पगार दिला जाणार आहे.