This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

ONGC मध्ये विविध पदांची भरती, असा करा अर्ज

 ongc recruitment

ओनजीसीमध्ये पब्लिक रिलेशन किंवा एचआर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून ४ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
ONGC Recruitment 2021: पब्लिक रिलेशन किंवा एचआरमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या (Government Job 2021) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (Ministry of Petroleum and Natural Gas)अंतर्गत येणाऱ्या तेल आणि नैसर्गिक वायू लिमिटेड (Oil & Natural Gas Ltd,ONGC) आणि देशातील एक महारत्न कंपनीने विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.या पदभरती अंतर्गत जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer) आणि एचआर एक्झिक्युटिव्हच्या (HR Exicutive) पदांची भरती केली जाणार आहे. कंपनीने १५ डिसेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या भरती जाहिरात (No.4/2021) नुसार, एचआर एक्झिक्युटिव्हच्या १५ पदांसाठी आणि जनसंपर्क अधिकारी (PRO) च्या ६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ONGC मधील या पीआरओ आणि एचआर भरती यूजीसी नेट जून २०२० (UGC NET June 2020 ) मधील स्कोअरच्या आधारे केली जाणार आहे.