This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत विविध पदासाठी भरती

 

Railway Recruitment 2021
Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत करिअर, नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. आरआरसीने लेव्हल ५/४, ३/२ साठी होणाऱ्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. १३ डिसेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया २७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

लेव्हल ५/४: जर तुम्हाला या लेव्हलसाठी अर्ज करायचा असेल, तर उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.

किती पदांसाठी होणार भरती?

रेल्वेच्या या भरतीअंतर्गत २१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये लेव्हल ५/४ ची ३ पदे रिक्त आहेत आणि लेव्हल ३/२ ची १८ पदे रिक्त आहेत. अर्जदाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. १ जानेवारी २०२२ पासून वयाची गणना केली जाईल.

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, PWD आणि महिलांसाठी अर्ज फी रु. २५० आहे.

अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.