This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

Railway Recruitment: मध्य रेल्वेअंतर्गत भरती, ९५ हजारपर्यंत मिळेल पगार


Railway Recruitment 2022Railway Recruitment: मध्य रेल्वेअंतर्गत भरती, ९५ हजारपर्यंत मिळेल पगार


मध्य रेल्वेच्या मुंबई प्रशासकीय विभागात एकूण ११ जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत फिजिशियन (Physician), ऍनेस्थेटिस्ट/ इंटेन्सिव्हिस्ट (Anesthetist / Intensivist) आणि जीडीएमओ (एमबीबीएस) (GDMO, MBBS)ची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड होणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ३ महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जात आहे. याअंतर्गत फिजिशियनच्या ४ जागा भरण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना ९५ हजारपर्यंत पगार दिला जाईल. अॅनेस्थेटिस्टच्या पदाच्या ४ रिक्त जागा भरण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारास ९५ हजारपर्यंत पगार दिला जाईल. जीडीएमओच्या ३ रिक्त जागा भरण्यात येणार असून उमेदवारास ७५ हजारपर्यंत पगार दिला जाईल.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी डॉ. B.A.M. रुग्णालय, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई, पिनकोड- ४०००२७ या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीला येण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. नोकरी, शिक्षण, अनुभवासंदर्भातील सर्व कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.