This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

Central Bank of India SO Recruitment 2022: सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची संधी, पगार ७८ हजारांपर्यंत

 Recruitment 2022: ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची संधी, पगार ७८ हजारांपर्यंत

Central Bank of India SO Recruitment 2022: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) एचआरडीच्या (HRD) विभागात १९ स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी अर्ज मागवत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०२ मार्च २०२२ आहे. इच्छुक उमेदवार Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

Central Bank of India SO Recruitment 2022

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने १० फेब्रुवारीपासून स्पेशलिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. २७ मार्च रोजी ऑनलाइन परीक्षा घेईल, ज्यासाठी १७ मार्च २०२२ रोजी प्रवेशपत्र जारी केले जातील. निवडलेल्या उमेदवारांना ६३,८४० रुपये ते ७८,२३० रुपये पगार दिला जाईल.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख – १० फेब्रुवारी २०२२

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – ०२ मार्च 2022

रिक्त पदांचा तपशील

या भरती मोहिमेअंतर्गत आयटी, वरिष्ठ व्यवस्थापकाची १९ पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी १० पदे सामान्य उमेदवारांसाठी, ५ OBC, २ SC, २ ST आणि १ पद EWS उमेदवारांसाठी आहेत.

.पात्रता काय?

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार संगणक विज्ञान / IT / ECE किंवा MCA / MSc मध्ये अभियांत्रिकी पदवीधर असावेत. यासोबतच उमेदवारांकडून ६ वर्षांचा अनुभवही मागवण्यात आला आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांची वयोमर्यादा ३५ वर्षे असावी. निवड ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीवर आधारित असेल.