This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

rrb je recruitment 2022 असा करा अर्ज

 rrb je recruitment 2022: तुमच्याकडे सिव्हील किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी असेल तर तुम्हाला रेल्वेत नोकरीची संधी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (Konkan Railway Corporation Limited, KRCL) असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीअर आणि सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदांवर भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत योग्य आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण १४ पदांवर भरती केली जाणार आहे.

rrb je recruitment 2022


जे उमेदवार या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करू इच्छितात, त्यांना ७ फेब्रुवारी २०२२ रोजी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की मुलाखतीच्या दिवशी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड सेक्टर-४०, सीवुड्स (वेस्ट), नवी मुंबई, ४००७०६ या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे यासाठी रजिस्ट्रेशन तेथेच सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होईल.

Railway Recruitment 2022

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे जारी नोटिफिकेशन नुसार, जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांनी मान्यता प्राप्त म्हणजेच AICTE शी संलग्न विद्यापीठातून किमान ५५ टक्के गुणांसह सिव्हील / मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये ग्रॅज्युएट किंवा समकक्ष पदवी प्राप्त केलेली असावी. असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीयर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ वर्षे असावे. या व्यतिरिक्त सीनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी वय ३५ वर्षे असावे.

उमेदवारांच्या अर्जांची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. उमेदवारांनी आपल्या खर्चाने किमान दोन दिवस राहण्याच्या तयारीने यायचं आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला https://konkanrailway.com/येथे भेट देऊ शकता