This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

SSC HSC Exam 2022: खुशखबर! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार

 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा (SSC HSC Exam 2022) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे.

SSC HSC Exam 2022


या विद्यार्थ्यांना यंदा कला गुण तर मिळणार आहेत, मात्र क्रीडा गुणांवर (Sports Quota Marks for 10th, 12th Exam) सावट होते. कोविड १९ प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. क्रीडा प्रकार शाळांमध्ये किंवा शाळास्तरावर झाले नव्हते. पण राज्य सरकारने यावर तोडगा काढला आहे

 

यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सातवी आणि आठवीच्या क्रीडा स्पर्धेतील सहभागानुसार तर बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा इयत्ता नववी आणि दहावीमधील क्रीडा स्पर्धा सहभाग घेऊन क्रीडा गुण दिले जाणार आहेत. ही सवलत यंदाच्या वर्षापुरती असणार आहे.

 

राज्याच्या क्रीडा युवक सेवा संचालनालयाने क्रीडा गुणांसंबंधीच्या या नियमाबाबत सर्व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. यात दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने राज्यात क्रीडा संस्कृतीच्या वाढीसाठी