This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

BMC Recruitment: मुंबई महानगरपालिकेत भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

 मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती केली जाणार आहे. न्यूरो सर्जन, गायनॅक, ईएनटी या डिपार्टमेंटमधील पदे भरली जाणार आहेत. यासाठी १४ आणि १५ मार्च रोजी थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.


BMC Recruitment: मुंबई महानगरपालिकेत (BMC Recruitment 2022) नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (Municipal Corporation of Greater Mumbai) आरोग्य विभागाअंतर्गत (Health Department Job) विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (MCGM Recruitment) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागातील न्यूरो सर्जन, गायनॅक, ईएनटी या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदाची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण ५ पदे भरली जाणार आहेत. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्या.