This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

RBI Assistant Recruitment 2022 पदवीधर तरुणांसाठी आरबीआयमध्ये नोकरीची संधी

 

RBI Assistant Recruitment 2022 : मुंबई : सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने 900 पेक्षा जास्त सहाय्यक पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. यानुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे.

RBI Assistant Recruitment 2022

 

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आरबीआयमध्ये 950 पदांवर सहाय्यकांची नियुक्ती केली जाईल. कोणत्याही शाखेतून तसंच विषयातून 50 टक्क्यांसह पदवी प्राप्त केलेले तरुण यासाठी अर्ज दाखल करु शकतात. इच्छुक तसंच पात्र उमेदवारांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईट rbi.org.in जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.

 

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज दाखल सुरु झाल्याची तारीख - 17 फेब्रुवारी 2022

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 8 मार्च 2022

परीक्षेची तारीख - 26 आणि 27 मार्च 2022

 

वयोमर्यादा

आयरबीआयमध्ये सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 फेब्रुवारी 2022 रोजी 20 ते 28 वर्ष असायला हवं. सरकारी नियमांनुसार आरक्षित वर्गासाठी सूट देण्यात आली आहे. इतर मागास वर्गासाठी तीन वर्षे तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.

 

अशी होईल निवड

आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सहाय्यक पदासाठी उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसंच लँग्वेज प्रोफिशिएन्सची टेस्ट परीक्षेच्या आधारावर केली जाईल. ज्यात पहिल्या टप्प्याची परीक्षा 26 आणि 27 मार्च रोजी ऑनलाईन घेतली जाईल.

 

असा दाखल करा अर्ज

- आरबीआयच्या अधिकृत वेबसाईट https://opportunities.rbi.org.in वर जा

 

- सहाय्यक पद भरती पर्यायावर क्लिक करा. नव्या रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करा.

 

- तुमचं नाव, संपर्क आणि ई-मेल आयडीची नोंद करा, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा